बंद

    राज्यपालांची जनतेला ‘शुभ दिपावली’

    प्रकाशित तारीख: November 6, 2018

    राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिपावलीचा मंगल सण सर्वांच्या, विशेषतः उपेक्षितांच्या जीवनात आनंद, समाधान व सुख- समृध्दी घेऊन येवो. दिवाळी साजरी करताना ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय.’ हा विचार अंगिकारायला हवा. सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.