बंद

    श्री. मोहम्मद फजल (10.10.2002 – 05.12.2004)

    श्री. मोहम्मद फजल
    केंद्र सरकारने, श्री. मोहम्मद फजल यांना राज्यपाल म्हणून नामनिर्देशित करण्यापूर्वी, खाजगी व सार्वजनिक अशा दोन्हीही उद्योगक्षेत्रांमधील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती.

    श्री.मोहम्मद फजल यांनी, दिनांक 26 नोव्हेंबर, 1999 रोजी गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला.

    त्यांनी, अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.

    श्री.फजल हे, एप्रिल 1980 ते जानेवारी 1985 या कालावधीत नियोजन आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य (मंत्री दर्जा असलेले) होते. यापूर्वी 1977 मध्ये ते भारत सरकारच्या औद्योगिक विकास विभागाचे सचिव होते.

    खाजगी व सार्वजनिक अशा दोन्हीही औद्योगिक क्षेत्रांमधील श्री.फजल यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. 1985 मध्ये शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर, श्री.फजल यांनी इंडो अमेरिकन संयुक्त उपक्रमाचे कार्यकारी अध्यक्ष यांसारखी खाजगी उद्योगक्षेत्रांमधील अनेक पदे भूषविली. याखेरीज ते आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लिश कन्सल्टन्सी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचे जवळजवळ पाच वर्षे संचालक होते. त्यांनी, जापनीज कन्सल्टन्सीसारख्या विशाल कंपनीत, 2 वर्षे वरिष्ठ सल्लागार म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. त्यांनी, व्यवस्थापन, पणन, कंपनी व्यवस्थापन इत्यादींशी संबंधित असलेल्या अनेक कार्पोरेट संस्थांच्या संघटना, औद्योगिक किंवा व्यावसायिक संस्था यांवर अध्यक्ष (प्रेसिडेन्ट) किंवा कार्याध्यक्ष (चेअरमन) म्हणून काम केलेले आहे.

    श्री.फजल हे, डिसेंबर 1998 ते नोव्हेंबर 1999 या कालावधीत, भारत सरकारच्या, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य होते.

    दिनांक ४ सप्टेंबर २०१४ रोजी फजल यांचे अलाहाबाद येथे निधन झाले.