बंद

    बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: August 21, 2018

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
    बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व भक्तीचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील गरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी घेऊन येवो. राज्यातील जनतेला विशेषतः सर्व मुस्लीम बंधू – भगिनींना मी बकरी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.