बंद

    प्रसिद्धीपत्रक

    27.01.2025: कोपर खैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झाल. यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    27.01.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव संपन्न

    राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव संपन्न कोपर खैरणे नवी मुंबई येथील…

    तपशील पहा
    26.01.2025:  देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, अमृता फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, आमदार अमीन पटेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ हेमलता बागला, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायक उदित नारायण,   वर्षा उसगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मुंबईचे मावळते आर्चबिशप ऑस्वाल्ड ग्रेशिअस व नवे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

    26.01.2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

    प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती देशाच्या…

    तपशील पहा
    26.01.2025: देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार व गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

    26.01.2025: प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

    दिनांक 26 जानेवारी 2025 वृत्त क्र.343 प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर…

    तपशील पहा
    26.01.2025: प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

    26.01.2025: प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

    प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल…

    तपशील पहा
    राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    24.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस; दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन…

    तपशील पहा
    23.01.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा  दीक्षांत समारोह संपन्न

    23.01.2025: विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे, पालकांना समाधानी ठेवून त्यांचा आदर करावा आणि स्वतःही आनंदी राहावे.- राज्यपाल

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सव्विसावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय…

    तपशील पहा
    23.01.2025: आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे उभय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    23.01.2025: राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

    राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र…

    तपशील पहा
    22.01.2025: राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

    22.01.2025: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील नवनियुक्त आदिवासी आमदारांचा सत्कार

    राज्यपालांच्या हस्ते राज्यातील नवनियुक्त आदिवासी आमदारांचा सत्कार आदिवासी प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार व्हावा : राज्यपाल राधाकृष्णन…

    तपशील पहा