बंद

    २६.०१.२०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राम नाईक यांची उपस्थिती

    प्रकाशित तारीख: January 26, 2020

    भारतीय प्रजासत्ताकाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी संध्याकाळी (दि.२६) राजभवनाच्या हिरवळीवर चहापानाचे आयोजन केले होते. राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली तसेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, राज्य मंत्रिमंडळतील सदस्य सुभाष देसाई, नवाब मलीक, अस्लम शेख व आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, लोकप्रतिनिधी, उद्योग विश्वातील राजश्री बिर्ला, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदांनी, विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी, मुख्यसचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली.