बंद

    प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्यपालांतर्फे सोमवारी लॅपटॉप वाटप

    प्रकाशित तारीख: November 3, 2018

    कृषी क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण कामगिरी केलेल्या निवडक शेतकऱ्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज भवन, मुंबई येथे लॅपटॉप कॉमप्युटरचे वाटप केले जाणार आहे.

    जून महिन्यात दूरदर्शनतर्फे देण्यात आलेल्या ११ व्या सहयाद्री कृषी सन्मान सोहळयाच्या वेळी राज्यपालांनी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे लॅपटॉप देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार १२ प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्यपाल समारंभपूवक लॅपटॉप देणार आहेत.

    संजय ज्ञानोबा शिंदे, नेकनूर, जि. बीड (जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य),ब्रम्हदेव नवनाथ सरडे, सोगाव, जि. सोलापूर (कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्य), दत्तात्रय गणपतराव गुंडावार, भद्रावती, जि. चंद्रपूर (कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य), ईश्वरदास धोंडीबा घनघाव, डोंगरगाव, जि. जालना (ग्रामीण कृषी प्रक्रिया उदयोगातील उल्लेखनीय कार्य), बाळासाहेब गीते, जि. उस्मानाबाद (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), अशोक राजाराम गायकर, जिल्हा रायगड, (मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), शरद संपतराव शिंदे, जि. नाशिक (फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), लक्ष्मण जनार्दन रासकर, जि. नाशिक (फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सौ.विद्या प्रल्हाद गुंजकर, जि. बुलढाणा (कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सुधाकर मोतीराम राऊत, जि बुलढाणा (कृषीपूरक उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), ताराचंद चंद्रभान गागरे (माजी सैनिक) जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्रीकृष्ण सोनुने जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी संस्था) अशी पुरस्कारार्थी विजेत्यांची नावे आहेत.