राजभवन येथे झाले महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे उदघाटन महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे नवउदयोजक घडण्यास मदत होईल – राज्यपाल
महान्यूज
राजभवन येथे झाले महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे उदघाटन
महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे नवउदयोजक घडण्यास मदत होईल – राज्यपाल
मुंबई दि.3 : महाराष्ट्रातील नवकल्पना असणाऱ्यांना आणि स्टार्ट अप विकसित करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे मोठे व्यासपीठ मिळणार आहे. आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे महारराष्ट्रात नवउदयोजक घडण्यास मदत होईल असा विश्वास राज्यपाल चे.विदयासागर राव यांनी व्यक्त केला.
आज राजभवन येथे महिनाभर सुरु असणाऱ्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचा शुभारंभ राज्यपाल चे. विदयासागर राव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य उदयोग मंत्री सुरेश प्रभू, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विभागाचे सचिव असिम गुप्ता आदी उपस्थित होते.
राज्यपाल चे. विदयासागर राव यावेळी म्हणाले की, उदयोजकता कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि उदयोजकांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी देशभरात स्टार्ट अप इंडिया उपक्रमाअंतर्गत स्टार्ट अप योजना सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळे प्रयोग होत असतात पण बाजारामध्ये त्या प्रोयोगाचा वापर जेव्हा केला जातो तरच ते इंनोवाशन यशस्वी होते.येणाऱ्या काळात आपले आयुष्य चांगले होण्यासाठी मानवी संसंधानाचा अधिकाधिक वापर आणि स्टार्टअप महत्वाचे ठरणार आहे.महाराष्ट्रातील उद्योजकांना स्टार्ट अप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा महाराष्ट्रातील उद्योजकांना लाभ मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा’ उपक्रमाचा फायदा होणार आहे. कृषी, पाणी व्यवस्थापन यामध्ये स्टार्ट अप होणे आवश्यक आहे. २० विद्यापीठाचा कुलपती मानून मी असे आवाहन करतो कि, २० विद्यापीठ आणि यामध्ये शिकणारे ३० लाख विद्याथी यांनी स्टार्ट अप मध्ये भाग घेऊन आपल्या कल्पना मांडाव्या.नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तीसाठी आणि स्टार्ट अप साठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्ट अप व्हॅन राज्यभरात फिरणार आहे याचा आनंद आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्टार्ट अप यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे याचा आनंद आहे. उद्योग आणि रोजगार क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. नॅस्कॉम यांनी दिलेल्या सर्वेक्षणानुसार, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स मध्ये २० कोटी रोजगार संपणार असले तरी २५ कोटी नवीन रोजगार निर्माण होणार आहे. यामध्ये ७० टक्के रोजगार नव्याने निर्माण होतील. आज भारताकडे युवाशक्तीची ताकद आहे, कारण ५० टक्केपेक्षा कमी लोकसंख्या २५ पेक्षा कमी वयाची आहे. या तरुणाई कडे असलेली प्रचंड उच्चशक्ती, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची आवड यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात इंनोवाशन होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप उत्कृष्ट असून येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात नवकल्पना समोर येणे आवश्यक आहे. उद्योग आणि रोजगार क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या कार्यक्रमात भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित स्टार्ट अप उदयोजक देखील सहभागी होणार असून, सहभागी नव उद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल तसेच विविध कार्यशाळांच्या माध्यमातून स्टार्ट संदर्भातील विविध विषयांमध्ये मार्गदर्शन मिळणार असल्याचा आनंद आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, तरुणांना भविष्याचा रास्ता दाखवण्यासाठी महत्वाचा ठरेल. भविष्य घडविण्यासाठी स्टार्ट अप हे एक माध्यम आहे. स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्ट अप व्हॅन राज्यभरात फिरणार आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेची ग्रॅड फिनाले नागपूर येथे होणार आहे. मुळातच स्टार्ट अप इकोसिस्टम रुजवणे हे या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे ध्येय आहे स्टार्ट अप या विषयातील मार्गदर्शन, रिसोर्सेस, इन्क्युबेटर, असलरेटरयासारखे स्टार्ट अपशी संबंधित विविध कार्यक्रम, फंडिंग मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस, आणि स्टार्ट अप इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सनां मिळणारे फायदे महाराष्ट्रातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचिवण्याचे लक्ष्य आहे.
विभागाचे सचिव यावेळी म्हणाले की, 16 जिल्हे 23 थांबे आणि 14 बूट कॅम्प होणार असून 3 नोव्हेंबरलानागपूरला या यात्रेचा समारोप होणार आहे. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींना तथा उदयोजकांना स्टार्ट अप इंडिया अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी www.startupindia.gov.in किंवा www.msins.in वर याबाबत नोंदणी करता येणार आहे.
आजच्या कार्यक्रमामध्ये १६ विद्यापीठांना इरादा पात्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.