बंद

नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुंबईत आगमन

प्रकाशित तारीख: September 4, 2019

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे बुधवारी (४ सप्टेंबर) मुंबई येथे आगमन झाले.

राज भवन येथे कोश्यारी यांना मुंबई पोलीसांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव अजोय मेहता व राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते.

गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भगत सिंह कोश्यारी राज भवन येथे राज्यपाल पदाची शपथ घेतील.