बंद

    छोडेन लेपचा राज्यपालांच्या हस्ते ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

    प्रकाशित तारीख: November 13, 2019

    अंतिम दिनांक:31.12.2019

    छोडेन लेपचा राज्यपालांच्या हस्ते ‘वन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

    ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे असे गौरवोद्‌गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

    दादर येथील स्वातंत्र वीर सावरकर सभागृहात सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना ‘माय होम इं‍डिया’ या संस्थेचा ‘वन इंडिया पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले की, श्रीमती लेपचा कठोर परिश्रमातून समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत; त्याच बरोबर अनाथ मुलांसाठीसुद्धा त्याचे मोठे कार्य आहे, हे त्यांचे राष्ट्रीय कार्य अभिनंदन आहे.

    या प्रसंगी त्रिपुराचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनिल देवधर, राहूल राठी, केंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता, आदी उपस्थित होते.