गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपालांची उपस्थिती
अंतिम दिनांक:31.12.2019
गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपालांची उपस्थिती
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त मुंबई शीख संगततर्फे आयोजित प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या.
भक्ती पार्क वडाला येथील दिवाण चंद राम शरण कंपाउंड येथे झालेल्या सोहोळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपालांनी गुरु नानक यांच्या समानता व विश्वबंधुत्वाच्या शिकवणीचे स्मरण दिले.
शेतात पिकलेले धान्य पाखरांपासून रक्षण करण्यासाठी गुरु नानक यांना पाठविले असता त्यांनी प्रत्येक जीवात परमात्मा जाणून सर्व पाखरांना धान्य मुक्तपणे खाऊ घातले होते, या प्रसंगाची आठवण देताना, शीख धर्मातली ‘लंगर’ या प्रथेमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा पाहण्याचा विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी विशेष तयार केलेल्या सुवर्ण व रजत मुद्रांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला चरणजीत सिंह सापरा, श्री गुरु सिंग सभेचे अध्यक्ष रघुबीर सिंग गिल, महासचिव मनमोहन सिंग, विश्वस्त हरिंदर सिंग तसेच हजारो भाविक उपस्थित होते.