कृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न
कृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृति आराखडा तयार करणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या देशातील सहा राज्यपालांच्या कृषी विषयक समितीची बैठक गुरुकुल, कुरुक्षेत्र, हरयाणा येथे आज (दि २५) संपन्न झाली. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या राष्ट्रीय उददीष्ट पूर्तीसाठी कृति आराखडा तयार करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे.
बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांसह आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन तसेच तेलंगणाच्या राज्यपाल तमिली साई सौदंरराजन उपस्थित होते.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवदत्त हे समितीचे निमंत्रक आहेत.