करोना संक्रमणथांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा
करोना संक्रमणथांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्यांसोबतचर्चा
राज्यातील काम समाधानकारक, परंतु प्रसार थांबविण्यासाठी अधिक जागरूकतेची गरज असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन·
नागरिकांसाठी हेल्पलाईनकार्यरत ठेवण्याची सूचना
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातीलसर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्तआयुक्त तसेच करोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशीव्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यातील वाढत चाललेले करोना संक्रमणथांबविण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
करोनाविरुद्ध लढ्यामध्ये राज्याने आतापर्यंतचांगले काम केले आहे. मात्र निजामूद्दीन येथे मरकज मध्ये सहभागी होऊन राज्यातपरतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकताठेवावी तसेच कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारीघ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
प्रत्येक जिल्ह्याने लोकांच्या मदतीसाठीआपद्कालीन हेल्पलाईन कार्यरत ठेवावी अशीही सूचना कोश्यारी यांनी यावेळी केली.
राज्यात करोनाच्या केसेस देशात सर्वाधिक आहेत.राष्ट्रपती देखील नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत.यादृष्टीनेराज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या व सद्यस्थिती, शासनकरीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीयसुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांचीउपलब्धता, स्थलांतरित कामगार,मजूर व बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनाची व्यवस्था,शेतमालाची विक्री होण्याचे दृष्टीने केलेल्या उपाययोजना,मदत कार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादि विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
स्थलांतरीत कामगार,मजूर व बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वांना भोजन,औषध सुविधा देण्यासोबत तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अशी सूचनाराज्यपालांनी अधिकार्यांना केली.
आरोग्य सेवा, स्वच्छता कर्मचारी, पोलीसांना शाबासकी
करोनाविरुध्द्ध लढ्यात आघाडीवर असलेलेडॉक्टर्स, नर्सेस,आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस,स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्यक सुविधा पुरविणारे लोक अत्यंत आव्हानात्मकपरिस्थितीमध्ये तपस्व्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊनत्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकार्यांना केली.
मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेशकाकाणी, कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीरावदौंड, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दिलीप म्हैसेकर, औरंगाबाद सुनील केंद्रेकर,नागपुर विभागीय आयुक्त संजीव कुमार,अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग वनाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने तसेचमुंबई शहर, उपनगर,रायगड, ठाणे,पुणे, सांगली,अहमदनगर, नागपूर,यवतमाळ, बुलढाणा येथील जिल्हाधिकार्यांनीयावेळी आपल्या अखत्यारीतील करोना व स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेची माहिती दिली.