बंद

    ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: April 30, 2020

    ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
    “अभिनेत्यांच्या मांदियाळीत ऋषी कपूर यांनी वेगळा ठसा उमटवला”: राज्यपाल

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘पहिले घराणे’ म्हणून लौकिक असणाऱ्या कपूर घराण्यात जन्मलेल्या ऋषी कपूर यांने सिनेसृष्टीला प्रदीर्घ काळ मोठे योगदान दिले. चित्रपट सृष्टीच्या सुर्वण कालखंडात अनेक दिग्गज अभिनेते व महानायकांच्या मांदियाळीत ऋषी कपूर यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला, यातच त्यांचे श्रेष्ठत्व दिसते. देखण्या आणि सहज सुंदर अभिनयाने साकारलेले त्यांचे अनेक चित्रपट लोकांच्या दीर्घकाल स्मरणात राहतील. इरफान खान यांच्या मागोमाग ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. या दुखद प्रसंगी राज्यातील जनतेच्या वतीने मी आपल्या शोकसंवेदना कपूर कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.