बंद

    आदिवासी सेवा मंडळाच्या घोटेघर आश्रमशाळा, जि. ठाणे येथे साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपालांचे भाषण.

    प्रकाशित तारीख: October 13, 2018

    आदिवासी सेवा मंडळाच्या घोटेघर आश्रमशाळा, जि. ठाणे येथे साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपालांचे भाषण.

    आदिवासी सेवा मंडळाच्या घोटेघर आश्रमशाळा, वाफे, त. शहापूर, जि. ठाणे येथे साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे भाषण. वेळ सकाळी ११.३० वाजता, शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१८

    मला चांगले मराठी येत नाही. अजूनही शिकत आहे. पण मी हळू हळू बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

    आज आपल्या गावात येऊन, तसेच आपणा सर्वांना भेटून खूप आनंद वाटला.

    राज्यपाल म्हणून, मी अनेक आश्रम शाळांना भेट दिली आहे.

    परंतु इतकी सुंदर, सुसज्ज आणि हिरवीगार आश्रम शाळा मी आज पहिल्यांदा पाहिली.

    सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचे मी याप्रसंगी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

    आपणा सर्वांच्या वतीने, मी, South Indian Education Society आणि विशेषतः अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

    पुढील वर्षी आपण महात्मा गांधी यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करणार आहोत.

    या निमित्त मुंबईतील नामांकित South Indian Education Society या संस्थेने आदिवासी सेवा मंडळाची ही आश्रमशाळा दत्तक घेतली.

    साडेचार कोटी रुपये खर्च करून Hostels बांधले, भोजन कक्ष बांधला आणि आश्रमशाळेचा कायापालट केला.

    डॉ. शंकर यांनी हे फार मोठे कार्य केले आहे. मी पुन्हा त्यांचे तसेच SIES या संस्थेचे अभिनंदन करतो.

    बंधुंनो आणि भगिनींनो,

    भारत हा निसर्ग-संपदेने नटलेला देश आहे.

    या संपदेचे रक्षण आदिवासी समाजाने केले आहे.

    तुम्ही सर्वांनी मिळून भारत समृद्ध केला आहे.

    याकरिता मला आपला अभिमान आहे.

    आज जग बदलले आहे.

    आधुनिक शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे.

    तसेच विविध कौशल्य प्राप्त करणे आवश्यक झाले आहे.

    त्यामुळे आपल्याला स्वावलंबी व स्वयंपूर्ण होता येईल.

    यास्तव, कुणीही मधेच शिक्षण सोडून जाऊ नये, अशी माझी आपल्याला विनंती आहे.

    राज्यघटनेच्या शेड्यूल पाच नुसार आदिवासी भागांच्या विकासाचे पालकत्व माझ्याकडे आहे.

    राज्यपाल या नात्याने आपण ग्राम पंचायतींना आदिवासी योजनेतील पाच टक्के निधि थेट मिळवून दिला.

    आपले गाव हे महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव झाले पाहिजे.

    आपले गाव स्वच्छ राहिले पाहिजे.

    या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी कर्तृत्वाने मोठा झाला पाहिजे.

    आपण सर्वांनी व्यसनांपासून, तंबाखूपासून दूर राहावे अशी माझी विनंती आहे.

    आज येथे येऊन खूप आनंद वाटला.

    ही आश्रमशाळा चांगली चालावी. यातून उत्तम विद्यार्थी व नागरिक तयार व्हावेत.

    ही आश्रम शाळा चांगली चालल्यास मी माननीय पंतप्रधान महोदयांना येथे भेट देण्याची विनंती करीन.

    पुनश्च आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपले दोन शब्द संपवतो.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!