आंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका योग सत्रामध्ये भाग घेतला आणि निवडक योगासने केली.
योग संस्था सांताक्रुझ यांनी या योगसत्राचे आयोजन केले होते. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार तसेच राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांचे कुटुबींय यांनी यावेळी योगसने केली.