१९.०१.२०२० सामाजिक जीवनात प्रामाणिकपणा महत्त्वाचा – राज्यपाल
सामाजिक जीवनात प्रामाणिकपणा महत्त्वाचा – राज्यपाल
ठाणे दि.19 जिमाका :चांगले कर्म, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसुत्री आहे. सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.ठाणे येथिल आर. जे. ठाकुर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशन आयोजित पाचव्या वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते.
यावेळी चंद परिवार फाउंडेशनचे नॅशनल कमिटी अध्यक्ष दि.बी चंद ,उपाध्यक्ष प्रकाश राजन,महासचिव महेश रजवाल,केंद्रीय कोषागार अध्यक्ष नवीन चंद ठाकुर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले चंद परिवार फाउंडेशन गेली पाच वर्षे खुप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये करीत आहेत. त्यांनी त्यांचे हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो.
हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी बोलायला शिकले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद परिवार फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट कार्यासाठी श्री सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ.दिनेश चंद यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन इसिता कासवाणी यांनी केले.