बंद

    राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचा पदभार स्वीकारला;

    प्रकाशित तारीख: August 19, 2020

    राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचा पदभार स्वीकारला;

    कोंकणीतून घेतली शपथ

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ घेतली. डोना पॉला, पणजी येथील राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी आपली शपथ कोंकणी भाषेतून घेतली.

    शपथविधी सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.