बंद

    ११.०१.२०२० आरोग्य सेवेत फिजिओथेरपिस्टची भूमिका महत्वाची

    प्रकाशित तारीख: January 11, 2020

    रुग्णाला उत्तम आरोग्य मिळवून देण्यात अस्थिेव्यंग्य तज्ञ व इतर विशेषतज्ञांप्रमाणेच फिजिओथेरपिस्टची भूमिका तितकीच महत्वाची आहे. फिजिओथेरपिस्टने रुग्णांना मदत करताना प्रेम व सहानभूतीची भावना ठेवावी, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज (दि. १० जाने )येथे केली.
    सोसायटी ऑफ इंडियन फिजिओथेरपिस्टस या संस्थेच्या 5 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन राज्यपालांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.
    अलिकडच्या काळात फिजिओथेरपिस्टचे महत्व लोकांना पटू लागले असून या व्यवसायाला संशोधनाच्या माध्यमातून प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
    फिजिओथेरपिस्टचा अभ्यासक्रम देणाऱ्या संस्था वैदयकिय महाविद्यालयांशी संलग्न असाव्या अशी सूचना आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलिप म्हैसेकर यांनी यावेळी केली.
    सोसायटी ऑफ इंडियन फिजिओथेरपिस्ट चे अध्यक्ष डॉ राजू पाराशर, मानद सचिव डॉ. नितेश बंसल आदी उपस्थित होते.