पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांनी आज (दि. ०५ ) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय पोलीस सेवेच्या १९ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी देखिल आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे स्वतंत्रपणे भेट घेतली.