बंद
    • 15.10.2024:  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आयएमए, बार असोसिएशन, वस्त्रोद्योग, चेंबर ऑफ कॉमर्स, खेळाडू, पत्रकार, पंढरपूर तसेच इतर देवस्थान प्रतिनिधी आदींशी चर्चा करुन जिल्ह्याच्या तसेच समाज घटकांच्या समस्या समजून घेतल्या. सुरुवातीला सोलापूर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर जिल्हा, सोलापूर शहर तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले तेली व सोलापूर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी राज्यपालांसमोर जिल्ह्य़ाबाबत तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासंदर्भात सादरीकरण केले. आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, यांसह विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज राज्यपालांशी जिल्ह्य़ातील समस्यांबाबत चर्चा केली.

      15.10.2024: राज्यपालांची सोलापूर येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    • 15.10.2024:राज्यपालांचे सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन

      15.10.2024:राज्यपालांचे सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन

    • 14.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मुंबई उपनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न; विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

      14.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मुंबई उपनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न; विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

    • 13.10.2024: राज्यपालांनी चिक्कबल्लापूर, कर्नाटक येथे आयोजित केलेल्या नवरात्री, दुर्गा पूजा आणि महा रुद्र होमाला उपस्थित होते

      13.10.2024: राज्यपाल चिक्कबल्लापूर, कर्नाटक येथे आयोजित केलेल्या नवरात्री, दुर्गा पूजा आणि महा रुद्र होमाला उपस्थित होते

    • 11.10.2024: राज्यपालांनी राजभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळातील वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले

      11.10.2024: राज्यपालांनी राजभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळातील वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले

    • 11.10.2024: आपल्या नांदेड जिल्हा दौऱ्यामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी नांदेड विश्रामगृह येथे संवाद साधला. सुरुवातीला राज्यपालांनी नांदेड येथील खासदार तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. संवाद सत्राला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भिमराव केराम, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधरराव पटने उपस्थित होते.. या शिवाय विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्प तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांबाबत सादरीकरण केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, यांच्यासह विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

      11.10.2024: राज्यपालांची नांदेड येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    • 11.10.2024: राज्यपालांची यवतमाळ येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

      11.10.2024: राज्यपालांची यवतमाळ येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …