17.10.2023 : Ambassadors and Consuls of ASEAN countries in India meet Maha Governor
17.10.2023 : Ambassadors and Consuls of the Association of South East Asian Nations (ASEAN) met Maharashtra Governor Ramesh Bais and discussed various issues at Raj Bhavan Mumbai . The visit was organized with the objective of increasing trade and cultural relations between India, especially Maharashtra and South East Asian countries. Ambassadors and consuls of Brunei Darussalam, Cambodia, Indonesia, Laos, Malaysia, Myanmar, Singapore, Thailand and Vietnam and their families were present on this occasion. All the ambassadors visited the places of historic importance in the Raj Bhavan premises. The meeting was organized at the initiative of the Industries Department and MIDC.
17.10.2023 : 'आसियान' या दक्षिण पूर्व आईयातील दहा देशांच्या संघटनेच्या भारतातील राजदूतांनी तसेच वाणिज्यदूतांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्व आशिया देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रुनेई दारूस्सलाम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम देशांचे राजदूत तसेच वाणिज्यदूत व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्व राजदूतांनी राजभवनात ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. बैठकीचे आयोजन उद्योग विभाग तसेच एमआयडीसीच्या पुढाकाराने करण्यात आले होते.