08.07.2022 : विद्यापीठाच्या चार शैक्षणिक इमारतींचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

08.07.2022 : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसर येथे ४ नवीन इमारतींचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन), ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत), मुलींचे वसतिगृह तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, विविध विभागांचे अधिष्ठाता व प्राधिकार मंडळांचे सदस्य, अध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.