30.11.2024 : Maharashtra Governor inaugurates seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’
30.11.2024 : 'एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण' या चर्चासत्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
30.11.2024 : 'एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण' या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज के सी महाविद्यालयाच्या सभागृहात केले. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी सयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्राला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन, महासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालय, दिप्ती चावला, अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालय, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला, एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारी, जवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.