28.04.2024 : Governor inaugurates Conference on AI in Healthcare
28.04.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील चर्चासत्र संपन्न
28.04.2024 : 'आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावरील एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झाले. राज्यपालांच्या हस्ते अकादमीचे माजी अध्यक्ष तसेच फेलो यांचा सत्कार करण्यात आला. चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ शिव कुमार सरीन, मनोनीत अध्यक्ष डॉ दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे सहाध्यक्ष डॉ अशोक गुप्ता, अध्यक्ष डॉ सतीश खाडिलकर, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.