26.09.2022 : Governor Koshyari applauds the work of Nana Palkar Smriti Samiti
26.09.2022 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Rugna Seva Sadan run by the Nana Palkar Smriti Samiti and interacted with cancer patients and their relatives at Parel in Mumbai. A memorandum of understanding for starting a Day Care Chemotherapy clinic at Borivali was signed between the Nana Palkar Smriti Samiti and the Tata Memorial Centre in presence of the Governor.
26.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे 'डे केअर किमोथेरपी' केंद्र सुरू करण्यासंदर्भात समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकांत बडवे, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.