26.01.2024 : Governor Ramesh Bais unfurls national flag at Republic Day State function
26.01.2024 : देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव नितिन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, सैन्य दले, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली व सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.