24.01.2023 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या ठाणे शाखेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याबद्दल निवडक सनदी लेखापालांचा राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला. देशाच्या विकासातील सनदी लेखापालांच्या योगदानाचा गौरव करताना सनदी लेखापालांनी प्रामाणिकपणा व सचोटी मूल्ये पाळून व्यवसायाचे पावित्र्य जपावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए स्वप्नील कोलते, उपाध्यक्ष सीए रजनीश शर्मा, धनंजय सिंह, तसेच सीए आदी उपस्थित होते.