20.07.2021 : मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३०५ तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाचे आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.