19.11.2023 : Raj Bhavan pays tributes to Indira Gandhi on birth anniversary
19.11.2023 : The 106th birth anniversary of former Prime Minister of India late Indira Gandhi was observed as National Integration Day at Raj Bhavan Mumbai. Secretary to the Governor (Addl Charge) Shweta Singhal offered floral tributes to the portrait of Indira Gandhi on the occasion. The ‘National Integration Pledge’ was read out to the staff and officers of Raj Bhavan on the occasion. Officers and staff reaffirmed their resolve ‘to preserve and strengthen the freedom and integrity of the nation and to continue to endeavor towards settlement of all differences relating to religion, language or region by constitutional means’. Comptroller of Governor’s Household Arun Anandkar and other officers and staff were present.
19.11.2023 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १०६ व्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय एकात्मता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त सिंघल यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची, तसेच धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.