19.02.2026 : Maharashtra Governor calls upon climate experts to include agriculture and rural economy in climate consultations
19.02.2026 : Maharashtra Governor Acharya Devvrat presided over the Concluding Plenary of the 3-day Conference titled “Mumbai Climate Week” in Mumbai. The Governor presented the MCW Innovation Challenge awards to nine organisations and startups working in the environment sector. The Conference was organised by 'Project Mumbai' in association with the Government of Maharashtra and Brihanmumbai Municipal Corporation. Minister of Environment and Climate Change Pankaja Munde, Minister of Information Technology and Cultural Affairs Ashish Shelar, Mumbai Mayor Ritu Tawde, 'Project Mumbai' founder Shishir Joshi, Board Member Jalaj Dani, experts in the field of Climate and Environment, researchers and government officials were present. Addressing the delegates, Governor Acharya Devvrat stated that no creature on earth has harmed nature and the environment; on the contrary, humans - considered the most intelligent beings - have caused tremendous environmental degradation. He said discussions on saving Climate must also include agriculture and the rural economy.
19.02.2026 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुरु असलेल्या 'मुंबई क्लायमेट वीक' या तीन दिवसांच्या पर्यावरण परिषदेचा समारोप झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ९ संस्था व स्टार्टअप्स यांना पर्यावरण क्षेत्रातील 'इनोव्हेशन चॅलेंज' पुरस्कार प्रदान करण्यात आले. चर्चासत्राचे आयोजन 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेने महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने केले. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, 'प्रोजेक्ट मुंबई'चे संस्थापक शिशिर जोशी, सदस्य जलज दाणी, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, अभ्यासक व शासनाचे अधिकारी उपस्थित होते. भूतलावरील कुठल्याही प्राण्याने निसर्ग व पर्यावरणाचे नुकसान केले नाही. त्याउलट सर्वात सुज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. पर्यावरण रक्षणाची चर्चा करताना त्यामध्ये शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देखील विचार झाला पाहिजे असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.