18.04.2023 : Members of Mock Youth Parliament meet Maharashtra Governor
Zoom 18.04.2023 : 'अभिरूप युवा संसदेच्या प्रतिनिधींनी साधला राज्यपालांशी संवाद'
18.04.2023 : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या युवकांच्या अभिरुप संसदेच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन संसदीय लोकशाही संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ रामेश्वर कोठावळे, युनिसेफ महाराष्ट्राच्या अधिकारी डॉ स्वाती महापात्रा व राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून आलेले अभिरुप संसदेचे सदस्य उपस्थित होते. राज्याच्या ग्रामिण भागातील युवक युवतींना संसदीय लोकशाही प्रणालीची ओळख व्हावी व त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे या उद्देशाने रासेयो स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या अभिरुप संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन मुंबई विद्यापीठाच्या कलिना शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.