18.03.2023 : Governor inaugurates C-20 Chaupal Initiative under G-20′
18.03.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'सी-२० चौपाल' कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
18.03.2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली यंदा होत असलेल्या जी-२० परिषदेचा एक भाग म्हणून सामाजिक संस्थांचा सहभाग असलेल्या 'सी-२० चौपाल' कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. सेवा इंटरनॅशनल व सेवा सहयोग फाऊंडेशनच्या वतीने वेलिंगकर संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सेवा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल नागरस, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एड. सदानंद फडके, सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या विश्वस्त डॉ अलका मांडके, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आपल्या वैयक्तिक मिळकतीतून समाज कार्यासाठी ३ कोटी रुपयांचे योगदान देणाऱ्या श्रीमती अनुश्री भिडे व आनंद भिडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.