16.09.2022 : Governor inaugurates SPINE 2022- International Conference of Spinal Surgeons
16.09.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन' संस्थेच्या परिषदेचे उदघाटन
16.09.2022 : पाठीच्या कण्याच्या तज्ज्ञांच्या 'न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन' या संस्थेच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (NSSA Spine 2022) उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाले. राज्यपालांच्या हस्ते लीलावती हॉस्पिटल येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन प्रा. डॉ अतुल गोयल यांना डॉ पी एस रमणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर न्यूरो सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ इको सुबागिओ व डॉ ऑस्कर एल्विस यांना संस्थेचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते डॉ पी एस रमणी यांनी लिहिलेल्या श्रीमद भगवद गीतेवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.