15.11.2022 : Governor addressed the first State Level Youth Mock Parliament
15.11.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari addressed the inaugural session of the first State Level Youth Mock Parliament at the Green Technology Auditorium of University of Mumbai at Kalina, Mumbai. The State Level Youth Parliament was organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan under the aegis of Ministry of Youth Affairs and Sports in association with UNICEF Maharashtra to educate the youth about the working of parliamentary democracy. The Governor felicitated the Young State Level Prime Minister, Speaker and the Leader of the Opposition of the Mock Parliament and released the book 'Social Media for Youth' on the occasion.
15.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहरू युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र व गोवा शाखेने युनिसेफ महाराष्ट्राच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पाहिल्या राज्यस्तरीय युवा अभिरूप संसदेला संबोधित केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे आयोजित या दोन दिवसांच्या अभिरूप युवा संसदेच्या उदघाटन प्रसंगी नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, युनिसेफ महाराष्ट्राच्या संचालिका राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या अधिकारी स्वाती मोहापात्रा व राज्य सल्लागार तानाजी पाटील तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे अभिरूप संसद सदस्य उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते अभिरूप मंत्रिमंडळातील युवा पंत्रप्रधान, सभापती व विरोधी पक्षनेत्यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 'सोशल मीडिया फॉर युथस' या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.