14.11.2022 : Governor launched a book ‘Mumbai Gives’
14.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'मुंबई गिव्हज' या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
14.11.2022 : बालदिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लहान मुलांच्या दातृत्वाच्या कथांचे संकलन असलेल्या 'मुंबई गिव्हज - मुंबई के लिए कुछ भी करेगा' या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले. 'प्रोजेक्ट मुंबई' या समाजसेवी संस्थेने अमर चित्रकथा या संस्थेच्या सहकार्याने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'मुंबई मैत्री' या वरिष्ठ नागरिकांच्या उपक्रमाच्या पोस्टरचे देखील प्रकाशन करण्यात आले.