08.01.2023 : Governor releases the book of Ghazals ‘Ek Aur Dushyant’
Zoom 08.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'एक और दुष्यंत'चे प्रकाशन
08.01.2023: बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'एक और दुष्यंत' या गजल संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे झाले. मुंबई हिन्दी अकादमी या संस्थेतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष पवन तिवारी, सचिव रामकुमार, साहित्यिक डॉ. करुणाशंकर उपाध्याय आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध लेखक राजेंद्र श्रीवास्तव, मनोज कुमार गोयल, 'पासबान ए अदब'चे संस्थापक कैसर खालिद, शायना एन.सी, डॉ स्मिता दातार, संजीव निगम, अनघा गांगल, राखी तांडेल व प्रवीण कुमार सागर यांना साहित्य, समाज व शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.