07.05.2026 : Vietnamese President arrives in Mumbai; is welcomed by Governor, CM
07.05.2026 : भारतभेटीवर आलेले व्हिएतनाम समाजवादी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष व महासचिव तो लम यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल व इतर मान्यवरांनी देखील त्यांचे स्वागत केले. आपल्या एक दिवसाच्या मुंबई भेटीमध्ये व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष राज्यातील उद्योजकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांची भेट घेणार असून आज संध्याकाळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ लोकभवन येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले आहे. आज रात्री ते मुंबई येथून प्रस्थान करणार आहेत.