03.07.2026: Governor presides over the 18th Foundation Day of Sarthak Educational Trust
03.07.2026: दिव्यांगांचे कौशल्य प्रशिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एज्युकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ल्ड ट्रेंड सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सार्थकचे अभिनंदन केले. सन २०२७ साली फिनलँड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होत असलेल्या दिव्यांग स्पर्धकांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक, माध्यमकर्मी व सार्थकचे सल्लागार सिद्धार्थ काक, केंद्र शासनाचे माजी सचिव व सार्थकचे सल्लागार लव वर्मा, सार्थकचे संस्थापक डॉ जितेंद्र अगरवाल, वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या संचालिका प्रिया पानसरे, संगीता जैन, दिव्यांग व्यक्ती तसेच नॅशनल ऍबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.