20.06.2026 : Maharashtra Governor dedicates School Bus for Tribal Students of Raigad District
Zoom 20.06.2026 : A school bus for students of tribal and rural areas in Raigad district was formally handed over by Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Maharashtra Lok Bhavan. The school bus has been donated by the Suman Ramesh Tulsiani Trust to the Madhyamik Vidyamandir run by Chhatrapati Shikshan Mandal at Ratwad in Raigad district. Trustee of the Suman Ramesh Tulsiani Trust Manish Rupani, office-bearer of Nana Palkar Smruti Samiti Krushna Mahadik, Honorary Secretary of Chhatrapati Shikshan Mandal Dr. Nilesh Revgade, and other representatives of the institution.
20.06.2026 : सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस देण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज ही स्कुलबस लोकभवन येथे शिक्षण संस्थेला विधिवत देण्यात आली. कार्यक्रमाला सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टचे विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समितीचे पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे मानद सचिव डॉ निलेश रेवगडे, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील रातवड येथील शाळा आठ गावांमधील तसेच ४ आदिवासी पाड्यांमधील १९६ मुलामुलींना शिक्षण देत असून स्कुलबस सेवेमुळे शाळेतील पटसंख्या ४२ विद्यार्थ्यांनी वाढली असल्याचे सांगण्यात आले.