07.05.2025 : Gondwana University inks MoU with Lloyds Metals, Australian University in presence of Governor
07.05.2025 : Tripartite Memorandums of Understanding (MoUs) were signed between the Gondwana University Gadchiroli, Lloyds Metals and Energy and the Curtin University from Western Australia in the presence of Maharashtra Governor and Chancellor of the university C P Radhakrishnan and Chief Minister Devendra Fadnavis at Raj Bhavan. Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, former Minister Sudhir Mungantiwar, MLC Parinay Fuke, Consul General of Australia in Mumbai Paul Murphy, Curtin University Pro-Chancellor Mark Ogden, Vice Chancellor of Gondwana University Dr Prashant Bokare, MD of Lloyds Metals B Prabhakaran, ACS Higher and Technical Education Venugopal Reddy, Secretary to the Chief Minister Shrikar Pardeshi, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, statutory officers and members of the Management Council of the University were present. The first MoU was signed between the Gondwana University and Lloyds Metals to establish an autonomous 'University Institute of Technology' in Gadchiroli for offering Engineering programmes to the students. The second MoU was signed between the Gondwana University and Curtin University in Western Australia for the offering of twinning degrees.
07.05.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचे सोबत सामंजस्य करारांचे राजभवन मुंबई येथे आदानप्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, लॉईड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे संविधानिक अधिकारी व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांचेमध्ये गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये जुळे कार्यक्रम (ट्विनिंग डिग्री) आयोजित करण्याबाबत करार करण्यात आला.