19.01.2025 : Governor concludes function of Divyang Maha Utsav ‘Purple Jallosh’
19.01.2025 : दिव्यांग महा उत्सव 'पर्पल जल्लोष'चा समारोप राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
19.01.2025 : दिव्यांग जनांच्या उत्कर्ष व विकासासाठी पिंपरी, पुणे येथे आयोजित तीन दिवसांच्या दिव्यांग महा उत्सव 'पर्पल जल्लोष'चा समारोप राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला राज्यपालांनी महा उत्सवा निमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली व दिव्यांगांच्या विविध स्टॉल्सवर जाऊन विक्रेते व कलाकार - कारागिरांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांग महा उत्सवाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने दिव्यांग भवन फाउंडेशनच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, पद्मश्री मुरलीधर पेटकर, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी तसेच इतर अधिकारी व दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते.