21.10.2023 : Governor gives away Self Employment Kits to Visually Impaired Women
21.10.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'नॅब' येथे दृष्टिबाधित महिलांना स्वयंरोजगार किटचे वितरण
21.10.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या वरळी मुंबई येथील मुख्यालयाला भेट दिली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दृष्टिबाधित महिलांना 'स्वयं - रोजगार किट' देण्यात आल्या. स्वयंरोजगार किट मुळे दृष्टिबाधित महिला आपला रोजगार कमवू शकतील. 'नॅब'चे अध्यक्ष हेमंत टकले, मानद सचिव डॉ विमलकुमार डेंगला, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम व दिव्यांग व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. राज्यपालांच्या हस्ते 'नॅब'ला योगदान देणाऱ्या दानशूर व सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.