05.07.2023 : President of India inaugurates Ramayana Sanskrutik Kendra of Bhartiya Vidya Bhavan
05.07.2023 : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भारतीय विद्या भवनच्या 'रामायण सांस्कृतिक केंद्रा'चे उदघाटन
05.07.2023 : राष्ट्रपती झाल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्र भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर जवळील कोराडी येथे भारतीय विद्या भवनच्या 'रामायण सांस्कृतिक केंद्रा'चे उदघाटन केले. उदघाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल व भारतीय विद्या भवनचे विश्वस्त बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र पुरोहित, जगदीश लखानी, अन्नपूर्णी शास्त्री आदी उपस्थित होते.