08.02.2023 : Nodal Officer of TB Mukt Bharat Abhiyan D. Dharma Rao meets Governor
08.02.2023 : The Nodal Officer of the Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan, Central TB Division, Ministry of Health and Family Welfare, Government of India D. Dharma Rao briefed the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari about the progress of the Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyaan in Maharashtra. The Governor was presented a Certificate of Appreciation in recognition of the adoption of TB patients by him under the Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan. State TB Officer Dr Sunita Golhait, Mumbai City TB Officer Dr Varsha Puri, Mumbai Asstt Health Officer TB Dr Usha Shelar, WHO Consultants Dr Harshad, Dr Rachna and Dr Sayali, District TB Officers from Mumbai and members of the National TB Elimination Programme were present.
08.02.2023 : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागाच्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे मुख्य संपर्क अधिकारी डी. धर्मा राव यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना अभियानाच्या राज्यातील प्रगतीबाबत अवगत केले. राज्यपाल कोश्यारी यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतल्याबद्दल धर्मा राव यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य क्षयरोग अधिकारी डॉ सुनिता गोल्हाईत, मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ वर्षा पुरी, सहायक आरोग्य अधिकारी मुंबई डॉ उषा शेलार, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ हर्षद, डॉ रचना व डॉ सायली, मुंबई शहरातील जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये सहभागी सदस्य उपस्थित होते.