15.01.2023 : Governor presides the ‘Uttarayani Kauthig’
15.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'उत्तरायणी कौथिग २०२३' महोत्सवाचे आयोजन संपन्न
15.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत 'पर्वतीय महापरिषद लखनौ' या उत्तराखंड समाजाच्या संस्थेच्या वतीने लखनौ येथे 'उत्तरायणी कौथिग २०२३' या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महापरिषदेचे मुख्य आयोजक टी एस मनराल, आयोजक के एन चन्दोला, अध्यक्ष गणेश चन्द्र जोशी, महासचिव महेन्द्र रावत तसेच उपाध्यक्ष मोहन सिंह बिष्ट यावेळी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी पर्यावरण कार्यकर्त्या पद्मश्री बसन्ती बिष्ट यांना पर्वतीय महापरिषदेच्या वतीने 'पर्वत गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.