12.01.2023 : Governor inaugurates the seminar of ‘Mumbai Sustainability Summit’
12.01.2023 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the 'Mumbai Sustainability Summit' organised by the Vivekananda Youth Connect Foundation on the occasion of Vivekananda Jayanti in Mumbai. The Governor presented the 'Mumbai Sustainability Awards' to various persons for their contribution to sustainable future. The Governor presented the 'Mumbai Sustainability Lifetime Achievement Award' to the Founder of Priyadarshini Academy Nanik Rupani. Jain Acharya Lokesh, BEST General Manager Lokesh Chandra, Sadguru Yogiraj Mangeshda, Swayam Rehabilitation Trust's Neeta Deolalkar, Principal of Wilson College Anna Pratima Nikalje, Soumya Swaminathan, Shantilal Gulechchha, Rishi Agarwal, Vaishnav Shetty and others.
12.01.2023 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबईच्या शाश्वत विकासासाठी संकल्पना व कृती योजना' या विषयावरील एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शाश्वत विकासाच्या मार्गावर कार्य करणाऱ्या विविध संस्था व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते प्रियदर्शनी अकादमीचे संस्थापक नानिक रुपानी यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अहिंसा विश्वभारतीचे आचार्य लोकेश, 'बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, सद्गुरु योगीराज मंगेशदा, 'स्वयम' पुनर्वसन ट्रस्टच्या नीता देवळालकर, विल्सन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ ऍना प्रतिमा निकाळजे, सौम्या स्वामिनाथन, शांतीलाल गुलेचा, ऋषी अगरवाल, वैष्णव शेट्टी आदींना शाश्वत कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.