22.12.2022 : Governor visited the Ramakrishna Math at Dhantoli
22.12.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari visited the Ramakrishna Math and attended the evening Aarti at the Ramakrishna Temple in Dhantoli in Nagpur. The Governor offered pranams to Bhagwan Sri Ramakrishna Paramhans, Ma Saradadevi and Swami Vivekananda. The Governor later visited the Library, Vivekananda Charitable Multi Therapy Dispensary and Students’ Home. President of the Math Swami Brahmasthananda welcomed the Governor. Swami Vipapmananda, Jyotiswarupananda, Sanjaya Maharaj, Santosh Maharaj and other Sadhus were present.
22.12.2022 : नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली. राज्यपालांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतले तसेच माताजी श्री सारदा देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना वंदन केले. आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबद्दल माहिती जाणून घेतली व विवेकानंद धर्मादाय मल्टी थेरपी डिस्पेन्सरी, ग्रंथालय व प्रकाशन विभागास भेट दिली. मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी स्वामी विपाप्मानन्द, स्वामी ज्योतिस्वरूपानंद, स्वामी तन्निष्ठानंद, स्वामी ज्ञानमूर्त्यानंद व इतर साधुवृन्द उपस्थित होता.