21.12.2022 : Governor witnessed the play ‘Mohjal’ at Raj Bhavan Nagpur
Zoom 21.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूर राजभवन येथे 'मोहजाल' नाट्याचे सादरीकरण
21.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील राजभवन येथे युवकांमध्ये ड्रग्सच्या वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या 'मोहजाल' या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी नाट्य सादरकर्त्या रंजन कला मंदिरचे अभिनंदन केले व कलाकारांना कौतुकाची थाप दिली. यावेळी मोहजाल नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे, सारिका पेंडसे, लेखक प्रसन्ना शेंबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, डॉ रवी गिर्हे तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नाटकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.