20.11.2022 : Governor Koshyari hosts youths from 4 Central Asian countries
20.11.2022 : An 85 member youth delegation from 4 Central Asian countries met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Youths from Kyrgyzstan, Tajikistan, Kazakhstan and Uzbekistan comprising artists, media persons, students and officials are visiting India at the invitation of Prime Minister Narendra Modi. The Governor felicitated delegation leaders - Egamberdiev Asliddin from Tajikistan, TAALAIBEK BERDIEV from Kyrgyzstan, Ms Ulbolsyn Orakbayeva from Kazakhstan and Islom Okhunov from Uzbekistan.
20.11.2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार मध्य आशियाई देशातील चार देशांमधील युवकांचे शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून शिष्टमंडळातील ८५ युवकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित युवकांच्या या भारत भेटीमध्ये किर्गिझस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तान देशांमधील कला, पत्रकारिता, शिक्षण, औषधी निर्माण तसेच प्रशासन क्षेत्रातील युवकांचा समावेश आहे. यावेळी राज्यपालांनी ताजिकिस्तान शिष्टमंडळाचे प्रमुख इंगंबरडीएव्ह अस्लीद्दीन, किर्गिझस्तान शिष्टमंडळाचे प्रमुख तलाईबेक बर्डीएव्ह, कझाकस्तान शिष्टमंडळाच्या प्रमुख उलबॉलसीन ओरॅकबाएव्हा आणि उझबेकिस्तानचे इस्लोम ओखुनोव्ह यांचा स्मृतिचिन्ह व खणाचे तोरण भेट देऊन सत्कार केला.