17.10.2022 : Governor presented the ‘Parmarth Ratna’ Awards
17.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'परमार्थ रत्न' पुरस्कार प्रदान
17.10.2022 : परमार्थ सेवा समिती या संस्थेच्या वतीने आयोजित 'दीपावली स्नेह संमेलन' या कार्यक्रमात टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक व ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र बडवे तसेच उपसंचालक डॉ शैलेश श्रीखंडे यांना यंदाच्या 'परमार्थ रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उभयतांना कर्करोग उपचार, शस्त्रक्रिया व संशोधनातील जागतिक पातळीच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रजत पदक प्राप्त करणाऱ्या अविनाश साबळे यांना 'परमार्थ खेल' रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.